Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकरला भिषण आग; सुदैवाने जिवितहानी ठळली..

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकरला भिषण आग; सुदैवाने जिवितहानी ठळली..


खोपोली- दत्तात्रय शेडगे

खोपोली मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येणार्‍या टँकरच्या केबिनला अचानक आग लागल्याची घटना घडली.
सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार मुंबइहून पुण्याच्या दिशेने जाणारा टँकर क्र. ( RJ 18 GB 5149) हा बोरघाट चढत असताना खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत टँकरच्या केबिनला अचानक आग लागली व आगीने भिषण रुप धारण केल्याने टँकरला आगीचा विळखा पडला होता.
याची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग पथक, डेल्टा फोर्स, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, अग्निशमन दल, लोकमान्य आरोग्य यंत्रणा यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत. अग्निशमन बंबातून पाणी फवारणी करत सदरची आग विझवली. केबिनला आग लागताच चालकाने गाडी थांबवत बाहेर पडल्याने जिवितहानी झाली नाही.
मात्र टँकरची केबिन व काही भाग जळून खाक झाला आहे. पहाटेच्या सुमारास वाहनांची संख्या कमी असल्याने फार वाहतूककोंडी झाली नाही.
- Advertisment -

You cannot copy content of this page