if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
(लोणावळा प्रतिनिधी)
लोणावळा : दि. 22 रोजी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा शहरातील सुरज अगरवाल ह्या तरुणाला दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, लोखंडी कोयता व रेम्बो चाकू सह अटक केली होती. त्यानंतर सुरज यास पुढील तपासा करीता लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आले होते.
सुरज ह्याच्याविरोधात 3(25), 4(25) व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले परंतु लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन दुसऱ्याच दिवशी त्याची जामिनावर सुटका झाली.
सुरज अगरवाल हा एक व्यावसायिक असून त्याकडे शस्त्र साठा कसा? हे शस्त्र त्याने कशासाठी व कोणासाठी आनली? शहरात काही विपरीत करण्याचा उद्देश आहे का ? या सर्व गोष्टीचा छडा अद्याप लोणावळा पोलीस लावू शकले नाही, लोणावळा शहरात गुन्हेगारीवरील पोलिसांची वचक कायम असून गेली बरीच वर्षे लोणावळा शहरात काही विपरीत घटना घडल्या नाहीत त्याबाबत लोणावळा पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावली असून सदरच्या घटनेने शहर वासियांना पुरते हलवून ठेवले असल्याने, अनेक प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले आहेत.त्यात वेगवेगळे तर्क वितर्क काढत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहेत.
जरका असेच असेल तर अवैध साठा केल्याप्रकरणीची भीती गुन्हेगारांमधून निघून जाईल आणि त्याचा त्रास सामान्य माणसांना भोगावा लागेल अशा शंका नागरिकांमध्ये निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर ह्या घटनेचा तपास करून, नागरिकांच्या शंकेचे निवारण करावे, असे लोणावळा नागरिकांचे म्हणणे आहे.