(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)
दि.12 कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील असेलेले आदिवासी भागातील रस्ता मंजूर असलेले पाली भुतीवली धरण दि 12 नोव्हेंबर 2020 राजी भुतीवली गावलगत येथे प्रत्येक्ष पाहणी करणयात आली आहे.आसल ग्रामपंचायत मध्ये एकूण 9 आदिवासी वाड्यांना जाणारा मार्ग आहे. भुतीवली गाव आणि पाली भुतीवली धरण हा रस्ता डॅम बाजूने जातो.हा रस्ता मार्ग खूप वर्षांपासून प्रलंबित आहे.नकाशावर या रस्ताची आराखडा तयार आहे.
परंतु हा प्रत्येक्षात रस्ता मात्र अजूनही मार्गी लागत नाही,यावेळी बोलताना जलसंपदा अधिकारी कर्जत (डेपोटी इंजिनिअर) रोकडे सर यांनी पाहणी करतेवेळी रस्ता लवकरात लवकर सुरू करणयात यावे असे आश्वासन देणायत आले आहे.तसेच आदिवासी वाड्यांना जाणाऱ्या रस्त्याला सुरुवातील एक पाण्याचा नाला आहे,त्या ठिकाणाहून सांकवची मागणी ही करणयात आली आहे.यावेळी सांकव बद्दल जलसंपदा अधिकारी रोकडे यांनी दिपावली नंतर लगेच प्रस्ताव तयार करून पुढील कारवाई साठी लवकरात लवकर पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले आहेत सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिक भूतवले रावसाहेबच ही विशेष सहकार्य लाभणार आहे.
त्यावेळी उपस्थित आसल ग्रामपंचायत सदस्या वनिता मोहन वारघडे,माजी उपसरपंच पुंडलिक कदम,मोहन वारघडे सर आणि रामचंद्र साळोखे डिकसळ इत्यादी आणि स्थानिक गावातील ग्रामस्थ मंडळी ही उपस्थित होते.
सदर ही कामे लवकरात लवकर सुरू झाली नाही तर आसल ग्रामपंचायत मधील आदिवासी वाड्यातील सर्व ग्रामस्थ मंडळ हे रस्ताच्या संदर्भत आंदोलन साठी रस्तावर उतणार आहे. आणि थेट आंदोलन करतील असा इशारा आदिवासी ग्रामस्थ देणायत आला आहे,आणि ग्रामपंचायत सदस्या यांनी केला आहे.