if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली-दत्तात्रय शेडगे
छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती आज बोरघाटात दस्तूरी येथे पार पडली, महाराजा यशवंतराव होळकर यांची 244 वी जयंती आज दस्तूरी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
इंग्रजांना सतत 18 वेळा पराभूत करणारे छत्रपती यशवंतराव होळकर हे एकमेव राजे होऊन गेले, त्यांची आज 244 वी जयंती साजरी करण्यात आली, ही जयंती बोरघाटात दस्तूरी येथे पार पडली, आमदार गोपीचंद पडळकर यांनी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून साजरी करण्यात आली.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते बबन शेडगे, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ शेडगे, सामाजिक कार्यकर्ते दीपक आखाडे, विवेक योगे, सतीश शेडगे यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..