कर्जत शहरातील नगरपरिषद हद्दीतील महाविरण कंपनी ट्रान्सफ़ॉर्म,एल.टी.पोल,एच.टी.पोल कर्जत नगरपरिषदच्या नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि पाठपुरावणे हलविण्यासाठी महावितरण कंपनी मंजुरी देणायत आली आहे.
कोरोनाच्या महामारी आणि लॉकडाऊन झाले नव्हते,आत्ता हळूहळू अनलॉक होत असताना आता कोठे कामाला सुरुवात होत आहे.यावेळी रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा ठरणारे पोल,ट्रान्सफ़ॉर्मरची जागा बदलण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे.
त्याचवेळी केंद्रजवळी जुनी छत्री आणि इद्रुस व्हीला असलेला महावीर पेठचा धोकादायक ६३० केव्हीचा ट्रान्सफ़ॉर्मर हटविण्यात ची स्थानिक नागरिकची बरेच वर्षेंची मागणी होती,त्यावेळी सुवर्णा जोशी नगरसेविका असताना त्यांनी महाविरण कंपनीला कार्यल्याशी पत्रव्यहार केला होता,तसेच महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळेसमोरील ट्रान्सफ़ॉर्मर हलविण्यासाठी शालेय व्यवस्थाकांची आणि स्थानिक रहिवाशीची मागणी होती.
सदर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले असताना ट्रान्सफ़ॉर्म,एल.टी.पोल,एच.टी.पोल हलविणेदेखील जरुरीचे होते.या सर्वच बाबी विचार करून कर्जत नगरपरिषद नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी महावितरण अधिक्षक अभियंता मंडळ पेण आणि उपकार्यकारी अभियंता कर्जत उपविभागीय यांच्याशी पत्र व्यहार करून आणि दूरध्वनीवरून पाठपुरावा करून संवाद साधला असताना विविध कामाची तांत्रिक मंजुरी मिळाली होती,मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे पुढील कामास चालना मिळाली नव्हती,लॉकडाऊन उठळ्यावर कर्जत नगरपरिषदमार्फत टेंडर प्रक्रिया पूर्ण होताच आता प्रत्येक्षात कामास सुरुवात करणयात आली आहे.