Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत बालमजुरी मुक्त करण्याचा दिशा केंद्र संचालित रायगड चाइल्ड लाईन यांचा प्रयत्न..

कर्जत बालमजुरी मुक्त करण्याचा दिशा केंद्र संचालित रायगड चाइल्ड लाईन यांचा प्रयत्न..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-

कर्जत तालुक्यातील प्रमुख बाजारपेठा पैकी कर्जत, कडाव ,कशेळे , कळंब , नेरळ , डीकसळ याठिकाणी नागरिक बाजारहाट करण्यासाठी जातात .परप्रांतीय तसेच स्थानिक रहिवासी बाजारपेठत हातगाडीवर तर गाळे विकत , भाड्याने घेऊन व्यवसाय करतात .फळे,भाजीपाला, किंवा इतर व्यवसाय करताना प्रसंगी घरातील दोन व्यक्ती लागतत,म्हणून आपल्या घरातील लहान मुलांना धंद्यावर बसविले जाते,तर कुठे – कुठे घरातील बिकट परिस्थिती असल्याने घराला हातभार लावून कुटुंब सावरण्यासाठी लहान मुलांना चहा विक्रेते , कपड्यांचे दुकान,नाश्ता सेंटर,वडा पाव हातगाडी,भाजी विक्रेते तसेच इतर व्यवसाय करणाऱ्या दुकानंदारांकडे बालमजुरीसाठी बालकांना ठेवले जाते.मात्र हे कायद्याने बेकायदेशीर आहे.

याबाबत कुटुंबातील मजबुरी हे कारण पुढे येत असल्याने या बालमजुरीतुन बालकांचे शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष,त्यामुळे पुढे होणारे त्याचे परिणाम,व देशाची अशिक्षित पिढी तयार होण्यापासून रोखणे हे देशव्यापी काम दिशा केंद्र संचालित रायगड चाइल्ड लाईन कर्जत तालुक्यात करत आहेत.


बालमजुरी रोखणे व व्यापारी वर्गात याबाबतीत प्रचार – प्रसार होण्यासाठी आज रायगड चाईल्ड लाईनच्या टीमने कर्जत बाजार पेठेत बालमजुरी विषयी जनजागृती करण्यात आली. १८ वर्षाच्या खालील मुले कुठे काम करू नये,असे कुठे आढळून आल्यास बालमजुरी कायद्याप्रमाणे व्यापारी अथवा व्यवसाय करणाऱ्याला शिक्षा होऊ शकते.

कर्जत बाजारपेठेत बालमजूर अनेक ठिकाणी व्यवसाय करताना दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे,प्रथम असे बालमजूर वाढू नये हे लक्षात घेता बाजारपेठेत व आजूबाजूचा परिसरात जनजागृती कार्यक्रम घेऊन भविष्यात असे बालमजूर व्यवसाय करताना दिसल्यास त्या व्यवसाय करणाऱ्या मालकावर कडक कारवाई होणार आहे.


या अनुषंगाने रायगड चाइल्ड लाईन यांनी कर्जत बाजारपेठतील दुकान, हॉटेल, व इतरत्र बाल मजुरी कायद्याने गुन्हा आहे व मुलांना शिक्षणाचा तसेच विकासाचा अधिकार आहे या बाबत तसेच चाइल्ड लाईन १०९८ बाबत सांगण्यात आले.हे जनजागृती कार्यक्रम बाल कल्याण समिती अध्यक्ष तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आयोजित करण्यात आले. या जनजागृती अभियानात रायगड चाइल्ड लाईन चे जगदीश दगडे,अनिता जाधव,विमल देशमुख, रूषाली देशमुख, वैजयंती श्रीखंडे हे होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page