कार्ला मावळ- प्रतिनिधी लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसा निमित्त कार्ला येथे २५ आदिवासी बांधवांना जेष्ठ शिवसैनिक विष्णू तुकाराम राणे यांच्या वतीने व कार्ला येथील जेष्ठ शिवसैनिक,सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश धोंडु जाधव यांचा सहकार्याने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेचे पुजन करून पुणे जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य शरदराव हुलावळे, पोलीस पाटील संजय जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे,कार्ला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सागरशेठ हुलावळे,माजी उपसरपंच अविनाश हुलावळे; नवनिर्वाचित ग्रामपंचायत सनी हुलावळे,सचिन हुलावळे,युवा कार्येकर्ते किरण गायकवाड,कैलास हुलावळे, जगन्नाथ पवार, राजाराम जाधव,कुंदा पटेकर,यांचा हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब हुलावळे यांनी शासनाच्या वतीने मिळत असलेल्या संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना, आदिवासी बांधवाच्या मुलांच्या शिक्षणा साठी फायदा व्हावा यासाठी जातीचे दाखले मिळवुन देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे असे आवाहन केले.या कार्येक्रमाचे नियोजन जेष्ठ शिवसैनिक रमेश जाधव,सनी जाधव,निखिल जाधव,गौरव जाधव,दिपाली रमेश जाधव,मोनिका संजय जाधव, आदींनी केले होते.