Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखडई धनगरवाड्याचा अनेक वर्षाचा पाणीप्रश्न सुटला…

खडई धनगरवाड्याचा अनेक वर्षाचा पाणीप्रश्न सुटला…


ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती अखेर थांबली,खाणाव ग्रामपंचायतच्या प्रयत्नांना यश…

खोपोली- दत्तात्रय शेडगे.

खालापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाड्याचा अनेक वर्षाचा पाणीप्रश्न खाणाव ग्रामपंचायतने सोडवला असुन ग्रामस्थांना भेडसावणारी पाण्याची समस्या संपली आहे.तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची असलेल्या खाणाव ग्रामपंचायत हद्दीत खडई धनगर वाडा हे गाव येत असून येथे २५ घरे असून १५० लोकसंख्या आहे, मात्र येथे पाण्याची कुठलीही सोय नसल्याने येथील ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असून येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

मात्र आता खाणाव ग्रामपंचायत ने १४ वित्त आयोगातून खडई धनगर वाडा येथे असलेल्या बोअरवेल मध्ये मोटार पंप टाकून त्याठिकाणी पाण्याची टाकीत सौरऊर्जेद्वारे पाईप लाईन टाकून दिली आहे .. त्यामुळे आता या गावात मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी मिळत असून ग्रामस्थांनी होणारी पाण्यासाठीची वणवण आता थांबली आहे.

तालुक्यात अतिशय प्रतिष्टेची खाणाव ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे, मात्र ही ग्रामपंचायत विकासाकामतही नेहमी अग्रेसर असून विद्यमान सरपंच मयुरी सुजित शिंदे , उपसरपंच मंगेश पाटील सदस्य नथुराम ढेबे, अंकुश शिंदे, किसन वाघमारे, गोपी वाघमारे, संगमी मोगारे, कामिनी पाटील, वैशाली पाटील, लक्ष्मी कातकरी, ग्रामसेवक अजेय फोफेरकर सामाजिक कार्यकर्ते सुजित शिंदे आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून हे काम झाले आहे.

प्रतिक्रिया- आमच्या ग्रामपंचायत हद्दीत दुर्गम भागात खडई धनगर वाडा हे गाव असून तेथे दरवर्षी पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत असते मात्र आम्ही ग्रामपंचायत मधून खडई येथे असलेल्या बोअरवेल चालू करून सौरउर्जेद्वारे पाईप लाईन टाकून दहा हजार लिटर पाण्याची क्षमता असेल एवढा पाण्याचा साठा उपलब्ध करून दिला असून ग्रामस्थांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले आहे यामुळे आता येथील पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

मयुरी सुजित शिंदे सरपंच- ग्रुप ग्रामपंचायत – खाणाव.
- Advertisment -

You cannot copy content of this page