Saturday, December 21, 2024
Homeपुणेलोणावळाएक्स्प्रेस हायवेवर केमिकल टँकरमधून केमिकल चोरी करणारे लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात.. टँकर...

एक्स्प्रेस हायवेवर केमिकल टँकरमधून केमिकल चोरी करणारे लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात.. टँकर व कार सह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त..

लोणावळा दि.30:लोणावळा ग्रामीण पोलीसांची कारवाई,केमीकलच्या टँकरसह एकूण 20 लाखाचा मुदेमाल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केला जप्त.पुणे मुंबई एक्सप्रेसहायवेवर साईडपट्टी ब्रीजखाली अंधाराचा फायदा घेवुन केमीकलच्या टँकरमधुन लाखो रुपयांचे केमीकल चोरी केले जात आहे.

अशी खात्रीशीर बातमी मिळताच लोणावळा ग्रामीणचे पो. नि. टी. वाय.मुजावर यांच्यासोबत पो.स.ई. अनिल लवटे, पोलीस स्टाफ आणि दोन पंचासह वरील बातमी प्रमाणे बोरज गावाच्या हद्दीतील ब्रिजखाली जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी ब्रीजच्या खालील साईडपट्टीच्या बाजुला अंधारात टैंकर क्रमांक MH43U7598 उभा होता. त्या टँकरच्या वरच्या झाकणाचे नटबोल्ट कापुन पाईपाच्या सहायाने कैमीकल चोरी करत असताना 3 इसम मिळून आले.

यात सदर गाडीचा चालक हा स्वतः केमीकल चोरी करण्यामध्ये सहभागी असून त्याचे नाव 1) गोरखनाथ फुलचंद जयस्वार( वय 57 वर्षे रा. कांजुरमार्ग, सईद्ध पाळ, मुंबई )तसेच त्याच्याबरोबर केमीकल चोरणारे इसम 2) मुकेश विवेक सिंग (वय 43 वर्षे रा. साई गॅलेक्सी, फ्लॅट नं. 307 किवळे देहूरोड, पुणे) 3) शिवकुमार शालीक साळुंखे (वय 34 वर्षे रा. चिखली घरकुल सोसा. फ्लॅट नं. 604 कर्मयोग हाउसींग सोसा, पुणे) हे मिळून आले.

सदर टैंकरमध्ये MEG (मोनो इथेनॉल ग्लायकन) हे रिलायन्स कंपनी नागोठणे जि. रायगड येथुन भरलेले केमीकल असून ते वड़की पुणे येथे खाली करण्यासाठी घेवुन जात असताना सदर टँकरचालक गोरखनाथ पुलचंद जयस्वार याने त्याचे दोन साथीदार यांना केमीकल चोरीचि अगोदर माहीती देवून मध्यरात्री त्यांच्या मदतीने एक्सप्रेस हायवेवर साईडपट्टी तुटलेली पाहुन त्या ठिकाणी लाखो रु.चे कैमीकल प्लॅस्टीकच्या बॅरलमध्ये चोरी करयाचे व तेवढ्याच वजनाचे पाणी हे टँकरमध्ये भरुन टँकरचे सील तुटलेले दिसु नये म्हणुन नवीन नटबोल्ट बसवायचे त्यामुळे सील शाबुत राहून कोणासही शंका येत नाही अशी माहिती आरोपींनी दिली.

सदर गुन्हयात एक टाटा कंपनीचा टँकर क्रमांक (MH43U7598) कैमीकलसह, एक टाटा कंपनीची इंडीगो कार क्रमांक (MH14CS7339), कैमीकल चोरी करण्यासाठी लागणारे पाईप, प्लॅस्टीकचे बॅरल असा एकूण 20 लाख रु.चा मुदेमाल पो. नि. मुजावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे.


सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील सो.मा. ए.एस.पी.नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर , स.पो.नि. माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, नाईक मयुर अबनावे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भुषण कुंवर, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत शिन्दे, होमगार्ड भदोरिया, होमगार्ड सागर बाळेकुंद्री यांनी केली.

- Advertisment -

You cannot copy content of this page