खालापूर( दत्तात्रय शेडगे)शहरा नजदीक आयरन मॉउटंन अर्थात ओईसी कंपनी असून या कंपनी असंख्य कामगार काम करित असून या कंपनीत गेल्या तीन वर्षापासून बहुतांशी कामगारांवर अन्याय होत असून याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना तीन वर्षाचा पीए न मिळाल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होताना कामगारांना न्याय मिळावा म्हणून येथील कामगारांनी युवासेना – शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपल्या व्यथा मांडल्याने कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना – युवासेना खालापूर तालुका आक्रमक झाली असून वेळीवेळी शिवसेना युवासेना नेत्यांनी कंपनी प्रशासनाची भेट घेत कामगारांवरचे अन्याय कधापी सहन केले जाणार नाही.
असे ठणकावून सांगितले असून याबाबत शिवसेना जिल्हा सल्लागार नवीनदादा घाटवल, तालुका समन्वयक एकनाथ पिंगळे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, विभागप्रमुख रोहिदास पिंगळे यांनी कंपनी व्यवस्थापनाबरोबर करीत आक्रमक पवित्रा कामगारांची भुमिका मांडली.
खालापूर शहरा नजदीक मुंबई – पुणे हायवे वरिल आयरन मॉउटंन अर्थात ओईसी कंपनीतील कामगार वर्गानी आपल्या सर्व समस्या खालापूर तालुका शिवसेना – युवासेना पदाधिकारी मांडल्या असता गेल्या तीन वर्षापासून येथील कामगारांना पीएफ न मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. येथील सर्व कामगार डीएलसी या ठेकेदाराच्या ठेक्या मध्ये काम करित आहेत.
मात्र या ठेकेदाराने अदयाप तीन वर्षाचा पीएफ कामगारांचा जमा न केल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याने वेळोवेळी कामगारांनी आपल्या व्यथा कंपनी व्यवस्थापनाशी मांडूनही कामगारांवर अन्याय होत असल्याचे पाहायला मिळत असून याबाबत कामगारांच्या सहनशक्ती अंत झाल्याने अखेर सर्व कामगारांनी काम बंद आंदोलन करीत आमच्या पीएफ जमा करा असा हट्ट धरला असता.
यावेळी आमदार महेंद्र थोरवेच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या बाजूने खालापूर तालुका शिवसेना – युवासेना खंबीर उभी राहिल्याने कामगारांची बाजू अधिक भक्कम झाल्याचे पाहावयास मिळाले. जर लवकरात लवकर कामगारांचा पीएफ जमा न झाल्यास शिवसेना – युवासेना विरूद्ध कंपनी प्रशासन संघर्ष पेटेल हे निश्चित.यावेळी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार नवीनदादा घाटवल, तालुका समन्वयक एकनाथ पिंगळे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, विभागप्रमुख रोहीदास पिंगळे, प्रसिध्दीप्रमुख भाऊ सणस, अमोल पाटील, विश्वनाथ भोईर आदिप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.