लोणावळा दि.6: शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याकरिता प्रशासकीय पातळीवर अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच काही निर्बंधही प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत. त्यापैकी तोंडाला मास लावणे हा निर्बंध चर्चेचा विषय बनला आहे. एखाद्या व्यक्तीच्या तोंडाला मास नसेल तर त्याला नगरपरिषद 500 रुपयाचा दंड आकरणे हे बंधनकारकच आहे. परंतु हा दंड कोण आणि कोणाकडून कसा वसुल करतो आहे याकडेही प्रशासनाने लक्ष देने गरजेचे आहे.
ह्या दंड वसुल करणारांकडून कुन्हा नागरिकांशी दुरव्यवहार होत नाही ना, कोणाकडून जबरदस्तीने दंड वसुल तर केला जात नाही ना किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी गैरवर्तन तर होत नाही ना याकडे लक्ष देनेही तेवढेच जबाबदारीचे आहे.परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून याचा फायदा प्रशासकीय कर्मचारी घेत आहेत आणि दंड वसुलीच्या नावाखाली गरीब नागरिकांना त्रास देत असल्याचा प्रकार आज सकाळी 11 वा. च्या सुमारास टेबल लॅण्ड,जी वार्ड,लोणावळा येथील एका किरकोळ चिकन व्यावसायिका कडून उघडकीस आला आहे.
टेबल लॅण्ड परिसरात असलेले जायद चिकन शॉप हे शाहिद शेख भाडेतत्वावर चालवत आहेत. आज सकाळी शाहिद हे आपल्या चिकन शॉप मध्ये नाश्ता करून पाणी पीत असताना काही अंतरावरून लोणावळा नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागाचे पर्यवेक्षक विकास मम्हाणे, सुरेश हाळुंदे आणि तीन चार कर्मचाऱ्यांनी पाहिले ते शाहिद यांच्याकडे पोहचण्यापूर्वी शाहिद यांनी तोंडाला मास लावलेले होते. पाणी पितेवेळी शाहिद याच्या तोंडाला मास नसल्या कारणावरून 500रुपये दंड भर असे बोलू लागले त्यांनी अचानक येऊन तोंडाला मास असताना 500 रुपये दंड भरण्याची मागणी केली असता शाहिद गडबडून गेला व त्याने याचा विरोध केला.
त्यावर सुरेश हाळुंदे यांनी शाहिद यांच्या बरोबर धक्का बुक्की केली, आरडा ओरडा करत त्याने परिसरात गोंधळ माजवत जबरदस्तीने शाहिद यांच्या दुकानातील कोंबड्यांचा खुराडा खोलून त्यातील इलेक्ट्रॉनिक वजन काटा घेऊन जातो असे बोलू लागला हे सर्व पाहता शाहिद याने समोरील व्यक्ती नगरपरिषदेचे कर्मचारी असल्यामुळे 500 रुपयांची पावती घेत दंड भरला. हा सर्व प्रकार जरी आज उघडकीस आला असला तरी शहरातील असे अनेक नागरिक आहेत की त्यांच्या बरोबरही ह्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन होत आहे.
सदर घटनेची माहिती विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांना फोन वरून कळविली असता मी बोलतो त्यांच्याशी असे प्रत्युत्तर आले. तसेच शाहिद शेख हे लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये सदरची तक्रार करण्यासाठी गेले असता आम्ही त्यांना बोलावून जाब विचारतो असे प्रत्युत्तर पोलीस प्रशासनाकडून मिळाले याची दखल अजूनही कोणी घेतली नाही , मग ह्या बेशिस्त कर्मचाऱ्यांना जाब कोणी विचारेल का,लोणावळा नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जास्तच मोकळीक दिली असल्याचे ह्या प्रकरणातून निदर्शनास येत आहे.
एकीकडे कोरोनामुळे व निर्बंधांमुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्यांची अशी दमदाटी ही खूप लाजिरवाणी बाब आहे तरी जिल्हाधिकारी पुणे यांनी ह्या दोषींची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे.