Friday, December 27, 2024
Homeपुणेमावळमायमर हॉस्पिटलवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा याकरिता आज मावळ तालुका शिवसेनेच्या...

मायमर हॉस्पिटलवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा याकरिता आज मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन…

तळेगाव दाभाडे :तळेगाव येथील मायमर हाॅस्पिटल वर खुनाचा गुन्हा कलम 302 दाखल करावा अशी मागणी करत आज सोमवारी शिवसेनेच्या वतीने मायमर हॉस्पिटल समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर समवेत तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रविवारी सकाळी कार्ला येथील माजी शिवसेना शाखा प्रमुख सोमनाथ हुलावळे यांनी मायमर रुग्णालयाच्या आय. सी. यु. शेजारील ऐका स्टोअर रुममध्ये टेलिफोन वायरच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सोमनाथ यांना कोरोना ची लागण झाल्याने 1 मे रोजी ते मायमर हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले होते.

मायमर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना सोमनाथ यांनी केलेल्या आत्महत्येचा प्रकार रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर व उपजिल्हा प्रमुख सदस्य शरद हुलावळे रुग्णालयात गेले असता ह्या संपुर्ण प्रकरणाला रुग्णालय जबाबदार असुन रुग्णालयावर खुणाचा गुन्हा दाखल करा अन्यथा सोमवारी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता.

त्याच अनुषंगाने आत्महत्येस रुग्णालय व्यवस्थापनेचा गलथान कारभार आणि हलगर्जीपनाच कारणीभूत आहे.रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी असताना त्याठिकाणी आत्महत्तेसारखा प्रकार घडने यासाठी सर्वस्वी सदर हॉस्पिटल जबाबदार असून मायमर हॉस्पिटल वर मनुष्य वधाचा 302 हा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लेखी स्वरूपात मावळ शिवसेनेच्या वतीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. आपल्या चुलत्याच्या मृत्युस मायमर हाॅस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दिनेश हनुमंत हुलावळे यांनी केला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page