Tuesday, January 14, 2025
Homeपुणेमुळशीवांद्रे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ हिलम यांची बिनविरोध निवड..

वांद्रे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ हिलम यांची बिनविरोध निवड..

मुळशी (दत्तात्रय शेडगे) तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची वांद्रे ग्रामपंचायत असून ह्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ बाबजी हिलम यांची बिनविरोध निवड झाली.वांद्रे ग्रामपंचायतचें उपसरपंच विष्णू लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ बाबजी हिलम यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.ही निवडणूक सरपंच दीपाली विनायक कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली,त्यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


यावेळी सरपंच दीपाली विनायक कोकरे, माजी उपसरपंच विष्णू लक्ष्मण शिंदे, सदस्या जाई भाऊ मरंगळे, ताराबाई दगडू माळी, सुमन विकास खराडे, विशाल भागूजी पडवळ, प्रमिला अन्नासो ढमाले, सामाजिक कार्यकर्ते विनायक कोकरे ,विकास खराडे, पोलीस पाटील संतोष गोरे, रमेश पडवळ आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page