खोपोली (दत्तात्रय शेडगे) कोविड रूग्णालयासाठी रायगड जिल्ह्यातील ७ आमदारांनी वैद्यकीय खर्च करण्याची परवानगी मिळाली आहे. उर्वरित सहा आमदारांनी शासकीय रुग्णालयांमध्ये आपल्या निधीतून वैद्यकीय साहित्य उपलब्ध केले आहे. खोपोलीत मात्र नव्याने रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने आणि प्रशासकीय पूर्ततेला वेळ लागत असल्याने उशीर होत आहे त्यामुळे खोपोलीतील कोविड रुग्णालयाला पालकमंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध असल्याचा आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला आरोप चुकीचा आणि राजकीय हेतूने केला असून पालकमंत्री आणि माजी आमदार रुग्णालय व्हावे याच मताचे आहेत.
आमचा पक्षही रुग्णालयासाठी आग्रही असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रेय मसुरकर यांनी केला असून दोन चार दिवसात रुग्णालय सुरू होईल असेही मसुरकरांनी सांगितले आहे.खोपोलीतील कोविड रुग्णालयाला पालकमंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध असल्याचा आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला आरोप चुकीचा आणि राजकीय हेतूने केला असून पालकमंत्री आणि माजी आमदार रुग्णालय व्हावे याच मताचे आहेत. आमचा पक्षही रुग्णालयासाठी आग्रही असल्याचे दत्तात्रेय मसुरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
खोपोलीतील कोविड रुग्णालयाला पालकमंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी गुरुवारी कर्जतमध्ये बोलताना केला होता. रुग्णालयाच्या कामात मांजर आडवी गेल्याची पातळी सोडून टीकाही थोरवे यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांचे नाव न घेता केली होती. आमदार महेंद्र थोरवे यांनी पातळी सोडून टीका केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर संताप व्यक्त करत महेंद्र थोरवे यांना लक्ष केले होते. आमदारांनी केलेले आरोप चुकीचे असून राजकीय हेतूने केल्याचे दत्तात्रेय मसुरकर यांनी माध्यमांशी बोलताना संगितले.
रुग्णालयासाठी नगरपालिका, कारखानदार, विविध संस्था पुढे आल्या असून आमदारांनीही आपला निधी दिला आहे.खोपोलीत सुरू होणाऱ्या कोविड रूग्णालयात लोकांवर मोफत उपचार केले जाणार आहे. रुग्णालय सध्या अंतिम टप्प्यात असून केव्हाही सुरू होण्याच्या तयारीत असताना पालकमंत्री किंवा माजी आमदार रुग्णालय होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करणे चुकीचे असून असे काही झाले नसल्याचा दावाही मसुरकरांनी केला आहे.
आपल्याला ४० वर्षाचा प्रशासकीय कामांचा अनुभव आहे. प्रशासकीय पूर्ततेला वेळ लागतोच असे स्पष्ट करत पालकमंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपांचे पक्षाच्या वतीने त्यांनी खंडन केले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत दत्तात्रेय मसुरकर यांनी पक्षाची बाजू मांडल्याने रुग्णलयात होणारे राजकारण थांबून रुग्णालय लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा खोपोलीकरांकडून व्यक्त होत आहे.