लोणावळा दि.31: कोरोनाच्या पार्श्व् भूमीवर सर्व व्यवसायांना तडा लागला असून रिक्षा चालक व मालकांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. त्याची दखल घेता महाराष्ट्र शासनाने परवानाधारक रिक्षा चालाकांसाठी अनुदान जाहीर केले आहे.
त्यासाठी परवानाधारक रिक्षा मालकांना मिळणाऱ्या आर्थिक अनुदानासाठी रिक्षा मालकांनी त्यासंदर्भातील फॉर्म भरणे अनिर्वाह्य आहे. त्याच अन्वये हे अनुदान प्राप्त करण्यातसाठी आवश्यक ती माहिती गरजेची असल्यामुळे याकरिता महाराष्ट्र वाहतूक सेना व शिवाजी मोटार ड्रायविंग स्कुल यांच्या वतीने लोणावळा शहरातील रिक्षा मालकांचे मोफत फॉर्म भरण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब फाटक असून सदर मोहिमेचे उदघाटन कामगार नेते व मावळ तालुका कामगार संघटनेचे अध्यक्ष मधुकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.तर आयोजक कमिटीचे शिवसेना संपर्क प्रमुख व महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, शिवाजी ड्रायव्हिंग स्कूल चे मालक मूर्ती साहेब त्याच प्रमाणे महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते उपाध्यक्ष विनय बच्चे,खजिनदार विकास खेंग्रे, हरिलाल आंभोरे, संजय शेडगे, सुनील तळेकर, रशीद पारवा (इराणी) इत्यादींच्या उपस्थितीत ह्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
सदर योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा त्यासाठी लोणावळा, खंडाळा,कार्ला,मळवली,कुसगाव या भागातील सर्व परवानाधारक रिक्षा मालकांना महेश केदारी यांच्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा व आपल्याला मिळणाऱ्या शासनाच्या मदतीचा लाभ घ्यावा.