Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसमाज बांधव धोंडीराम गोरे यांना मदतीचा हात..समाजाने दिला एक हात मदतीचा....

समाज बांधव धोंडीराम गोरे यांना मदतीचा हात..समाजाने दिला एक हात मदतीचा….

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे )
खालापूर तालुक्यातील पाली वावरले येथे राहणारे धोंडीराम कोंडू गोरे यांना कोरोना आजाराची लागण झाली असून त्यांना आता मुबंई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून घरात कोणीही कमावते नसून त्यांना आई ,पत्नी व दोन लहान मुलं आहेत.

त्यांच्या घरची जबाबदारी त्याच्यावर आहे मात्र त्यांना गेल्या अनेक दिवसापासून कोरोना आजाराने ग्रासले असून त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी समाजाकडे मदतीचा हात मागितला होता याची दखल घेत शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी पुढाकार घेत समाज बांधवांना भेटून मदत गोळा करून 1 जून रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत साधा पद्धतिने वाढदिवस साजरा करत समाज बांधवानी जमा केलेली मदत धोंडू गोरे यांच्या कुटूंबाना सुपूर्त केली.

देशावर कोरोना आजाराचे मोठे संकट असून सगळी कडे मिनीलॉकडाऊन असल्याने सगळ्यांचेच कामधंदे व्यवसाय बंद आहेत मात्र अश्या परिस्थितीत आपला धनगर समाज बांधव अडचणीत असल्याने त्याला सामाजिक बांधिलकी जपत मदत केली पाहिजे ,यासाठी पुढाकार घेत शिंग्रोबा उत्सव कमिटी आणि धनगर समाज बांधव यांनी आपली ऐपत असेल त्या प्रमाणे मदत केली , जेणेकरून आपला समाज बांधवांचा जीव वाचून त्याला एक हात मदतीचा मिळेल.


धनगर समाज बांधव धोंडू गोरे यांच्यावर आजही मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना अजूनही समाज बांधवांनी मदत करावी असे आवाहन धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page