Saturday, December 21, 2024
Homeपुणेलोणावळामाझ्या उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा तयार केल्याचा संजय घोणे यांचा आरोप...

माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा तयार केल्याचा संजय घोणे यांचा आरोप…

लोणावळा : सध्या केंद्र सरकार आणि राज्यसरकार यामध्ये कट्टर असणारे विरोधी पक्ष लोणावळ्यात मात्र मांडीला मांडी लावून लोणावळा नगरपरिषदेच्या पदाधिकाराची धुरा सांभाळून आहे.भाजपा कडून काँग्रेस पक्षाच्या संध्या खंडेलवाल यांची बिनविरोध निवड झाल्याने सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षामध्ये वातावरण तापलेलेच.

लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या कालावधीत मागील सहा महिन्यानंतर चौथ्यांदा उपनगराध्यक्ष पद काँग्रेसच्याच ताब्यात त्यामुळे कोरोनाच्या काळातही शहरातील राजकारण तापले असल्याचे विरोधी पक्षाकडून कळत आहे. लोणावळा नगरपरिषदे मध्ये चक्क दोन कट्टर विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ता उपभोगत आहे. त्याकडे मात्र जिल्हापातळीवरील पक्षांधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे लोणावळ्यातील मतदारांची मात्र कोंडी होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

पुढील इलेक्शनला मतदान नक्की करायचे कोणाला? लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद उपभोगण्यासाठी कट्टर विरोधक असणाऱ्या भाजपा समोर हतबल झालेल्या काँग्रेसला असा प्रश्न मतदारांना पडत आहे.दोन्ही पक्षातील सामान्य नागरिकांमध्ये एकमेकांचा कट्टर विरोध केला जात आहे. परंतु सत्तेसाठी राजकारणी मात्र विरोधकांच्या मांडीला मांडी लावून काम करत आहे यात प्रत्यक्षरित्या बळी जात आहे सामान्य नागरिकाचाच. सहा महिन्यांपासून लोणावळा नगरपरिषदेमध्ये चाललेले राजकारण पाहून नागरिकांमध्ये तर्क वितर्क सुरु आहेत.

आज लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर संध्या खंडेलवाल विराजमान होताच बनावट राजीनामा तयार करून फसवणूक झाल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष संजय घोणे यांनी केला आहे.नवीन उपनगराध्यक्षाची निवड करण्यापूर्वी अगोदरच्या उपनगराध्यक्ष यांनी रीतसर राजीनामा देने गरजेचे असून संजय घोणे यांच्या सही शिक्क्या च्या लेटर हेडवर बनावट राजीनामा बनवून मुख्याधिकारी यांना सुपूर्द केला असल्याचा आरोप संजय घोणे यांनी केला आहे.

संजय घोणे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या लेटर हेडवर उपनगराध्यक्ष पदाचा बनावट राजीनामा तयार करून तो मुख्याधिकारी यांना दिला जाईल याची शंका आल्याने संजय घोणे यांनी तसे पत्र लो. न. पा. चे मुख्याधिकारी यांना पाठविले होते त्यातून घोणे यांनी माझ्या अनुपस्थितीत मिळालेला राजीनामा ग्राह्य धरू नये, मी प्रत्यक्ष राजीनामा घेऊन आल्यास तो मंजूर करावा असे पत्रामार्फत कळविण्यात आले होते.

बनावट राजीनामा बनवून फसवणूक केल्या संदर्भातील तक्रार घोणे यांनी लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी पुणे यांना केली असल्याचे यावेळी बोलताना संजय घोणे यांनी सांगितले आहे. तसेच काल दि.1 रोजी पुणे जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना ऑनलाईन पद्धतीने होणारी निवडणूक सध्या रद्द करावी असा आदेशही देण्यात आला होता. त्या आदेशाचा भंग करत आज ऑनलाईन पद्धतीने उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक करण्यात आली आहे आणि ती बेकायदेशीर आहे असेही घोणे यांनी बोलताना सांगितले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page