हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी विरोधात लढा पुकारणार..
(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी आक्रमक व शिस्तबद्ध कार्यामुळे आजपर्यंत अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे,म्हणूनच हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने उरण – पनवेल या तालुक्यातील अन्यायग्रस्त प्रकल्पधारक शेतकरी त्यांच्यावर अन्याय करून कामावरून काढणार असल्याने येथील कामगारांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कंपनीच्या विरोधात आक्रमक लढा देण्यासाठी भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा सांगितल्या असता.
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार , यासाठी मा. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची प्रसंगी भेट घेऊ,पण कामगारांच्या न्याय – हक्कासाठी कंपनी विरोधात लढा देऊ , असा आक्रमक पावित्रा हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे कंत्राटी कामगार त्यांच्या भेटीस आले असता त्यांच्या व्यथा ऐकून त्यांनी घेतला. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत गेली ३ वर्षापासून उरण – पनवेल येथील आपली शेती गेलेली कुटुंबातील सदस्य काम करीत आहेत.या कंपनीने गोड बोलून येथील शेतकऱ्यांकडून शेती घेताना आपल्या कुटुंबातील एक सदस्य कामावर घेऊ,असे आश्वासन दिले होते ,व शेतीचा तुटपुंजा मोबदला देऊ केला होता.
या कंपनीत काम मिळेल , या भोळ्या समजेतून शेती दिल्यावर कंपनीने उरण- पनवेल मार्गावर असलेल्या कंपनीच्या चौकीवर कुटुंबातील एक तरुणास सिक्युरिटी म्हणून काम दिले होते , मात्र आज ३ वर्षे झाल्यावर गॅस पाईप लाईनचे काम संपल्यावर कामावर असलेल्या कामगारांना कंपनी प्रशासनाने अचानक कमी करण्याचा घाट घातला आहे.
हे सारे २८ कामगार सिक्युरिटी गार्ड किंवा तत्सम ड्युटी उरण ते पनवेल भागात करत असताना तत्कालीन अधिकारी इंगोले यांनी दिलेल्या आश्वासनाला घुमजाव करत कंपनी प्रशासन या तरुणांना बेरोजगार करत आहेत.त्यामुळे त्यांची शेतीही गेली आणि आता त्यांचे रोजीरोटी वर देखील गदा आली आहे.त्यामुळे सर्व कामगार भयभीत झाले आहेत.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी आज त्यांनी भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली असता त्यांची सर्व व्यथा ऐकून भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असून तुम्हाला न्याय मिळवून दिल्या शिवाय राहणार नाही , यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या विरोधात तीव्र लढा पुकारू , पर्यायी मा. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची मदत घेऊ , असे आक्रमक मत भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांनी व्यक्त केले . त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा कामगारांना दिलासा मिळाला आहे .