जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून गोरगरिबांची करणार कामे..
(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
हार नही मानूंगा – शर नही ठाणूंगा , काल के कपाल पर, लिखता मिटाता हूं,या अटलबिहारी वाजपेयी यांच्या गीताप्रमाणे कर्जत – खालापूर मतदार संघावर पूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व होते , मात्र काळाच्या ओघात मागे पडलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी तरुण नेतृत्व म्हणून उदयास येत असलेले नाविन्याच्या ध्यासासाठी – कर्जतच्या विकासासाठी म्हणून काम करणारे भाजप किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या रूपाने भविष्यात आमदारकीची पोकळी भरून तर काढणार नाही ना ? अशी राजकीय गणिते सध्या कर्जतमध्ये बांधण्यात येत आहेत.
त्यास निमित्त होते भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा.यावेळी सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कोकण संघटक जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वाढदिवसानिमित्त व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी सुनील गोगटे म्हणाले की , कर्जत खालापूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढत चालला आहे.
शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत त्यांच्या असलेल्या समस्या कोकण संघटक म्हणून मी सोडविल्या आहेत.पक्ष निवडणुकीत उतरून खालपासून वरपर्यंत सदस्य निवडून येणे गरजेचे आहे, यासाठी पूरक वातावरण आम्ही सर्वांच्या सहकार्याने बनविले आहे.ग्रामीण भागातील येणाऱ्या कार्यकर्त्यांची , शेतक-यांची कामे ,व क्षणभर विश्रांती घेण्यास हे जनसंपर्क कार्यालय आहे. येथे आलेल्यांचे पक्ष – जात – पंथ – गरीब हे न बघता समस्यांचे निराकरण होणार , असे खात्रीने सुनील गोगटे यांनी हमी दिली.तर जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे शुभेच्छा देताना म्हणाले की , या कार्यालयात शहरातील , तालुक्यातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे.
सुनील गोगटे यांची काम करण्याची जिद्द – चिकाटी व सर्व शक्ती पणाला लावून काम करतात , जबाबदारीने काम करत असल्यानेच अनेक तक्रारी व आलेल्यांच्या समस्या सोडविण्यात ते यशस्वी होत आहेत.आधी केले,मग सांगितले,असा त्यांचा स्वभाव असल्याने नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहेत.म्हणूनच आजचा दिवस,उद्या नसतो,निसर्गात बदल होत असतात भविष्यात तुम्हाला नक्कीच नेतृत्व करण्याची संधी तुमच्या संयमी स्वभावामुळे मिळेल अशा पुढील कार्यास शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर , माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी , कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत , अशा अनेकांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या .त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्जत न.प. नगरसेवक तथा शहर अध्यक्ष बळवंत घुमरे , तालुका सचिव संजय कराळे , उद्योजक सुनील सोनी , प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख , जिल्हा चिटणीस रमेश मुंडे , नरेश जोशी ,नगरसेविका विशाखा जिनघरे ,शहर उपाध्यक्षा शर्वरी कांबळे ,संतोष भोईर ,सुषमा ढाकणे कर्जत तालुका महिला अध्यक्षा स्नेहा गोगटे , तालुका उपाध्यक्षा ऍड . गायत्री परांजपे ,माथेरान नगर परिषदेच्या नगरसेवक व नगरसेविका , सर्वेश गोगटे , गवळे , त्याचप्रमाणे भाजप चे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते , त्यांचा चाहता वर्ग , मित्र परिवार , असे अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते .यावेळी अनेकांनी पक्षात प्रवेश केला , तर पत्रकारांना रेनकोट वाटप करण्यात आले.