Sunday, December 22, 2024
Homeपुणेमावळकार्ला येथून 31 वर्षीय युवक बेपत्ता,लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल..

कार्ला येथून 31 वर्षीय युवक बेपत्ता,लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल..

कार्ला दि.28 : कार्ला मावळ येथून एक 31 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. वैभव विठ्ठल राजीवडे ( वय 31, रा. सध्या वडगाव फाटा, मूळ राहणार कल्याण, जि. ठाणे ) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव व पत्ता असून हा युवक दि.27 रोजी पहाटे 3 ते सकाळी 6 च्या सुमारास कार्ला गावातून कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे.

त्याच्या नातेवाईकांनी सगळीकडे चौकशी केली असता तो सापडला नाही. त्यासंदर्भात रितेश दत्तात्रय दळवी ( वय 28, रा. कार्ला, मावळ ) याने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली मिसिंगचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश होळकर करत आहे.

बेपत्ता युवकाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग निमगोरा, काळे डोळे, गोल चेहरा, नाक सरळ, काळे केस, चेहऱ्यावर काळी दाढी व मिशी, उंची 5 फूट 8 इंच, सडपातळ बांधा, अंगावर पांढरा लाल निळ्या रंगाचे आडवे पट्टे असलेले चैन वाले फुल हाताचे शर्ट व पायात लाल रंगाचे सॅंडल आहे.ह्या वर्णनाची व्यक्ती आढळ्यास सदरची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात कळवावी .

- Advertisment -

You cannot copy content of this page