देहूरोड दि.- 9 : अत्यावश्यक वस्तुच्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे आंदोलन.देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौक येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी व पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार देहुरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तू यांची केलेली दरवाढ कमी करण्यासाठी देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनास प्रदेश सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील , पुणे जिल्हा सरचिटणीस सोपानराव म्हस्के , पुणे जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा सीमाताई सावंत आणि तळेगाव दाभाडे महिला अध्यक्षा संध्याराजे दाभाडे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे सूत्र संचालन कार्याध्यक्ष दीपक सायसर यांनी केले. सदर आंदोलनात उपस्थितांनी केंद्र सरकारच्या विरोधात महागाईच्या विरोधात मोर्चा काढून जाहीर निषेध केला.
यावेळी देहूरोड गावकामगार तलाठी अतुल गीते व देहूरोड वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंडे यांना निवेदन देण्यात आले. निषेध आंदोलनास अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष गफूर भाई शेख, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, विल्सन पालीवाल, संभाजी पिंजण,पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा रानीताई पांडीयन,संगीता वर्धा, सिंधू शिरसाट, येशू भंडारी, योगेश टाकळकर,आसिफ सय्यद तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.