Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडहाळ न्हावंडे तळवली येथील शेतकऱ्यांचा आवाज विधानपरिषदेत.

हाळ न्हावंडे तळवली येथील शेतकऱ्यांचा आवाज विधानपरिषदेत.

कोकण संघटक सुनील गोगटे यांनी मांडल्या विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकरांकडे व्यथा..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
एखादं काम किंवा समस्या घेऊन तुम्ही आलात तर ते काम होणार म्हणजे होणारच ,समस्या सुटणार म्हणजे सुटणारच असा ध्यास घेऊन कर्जत – खालापूरच्या सर्वांगीण विकासासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपली शर्थ पणाला लावून वरिष्ठ पातळीवर आवाज उठविणारे भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे हे राजकीय क्षेत्रात ” अव्वलच ” म्हणावे लागणार खालापूर तालुक्यातील हाळ – न्हावंडे – तळवली या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. ५ जुलै २०२१ रोजी त्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळवुन देण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांच्याकडे न्याय मागण्यांसाठी आले होते.

हि कैफियत त्यांनी लगेच राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याकडे मांडली असता त्यांनी देखील तातडीने त्याची दखल घेतली.शहापूर – कशेळे – कर्जत – पळसदरीमार्गे हाळ – खोपोली – वाकण फाटा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ अ असा होत असून कर्जत – पळसदरी – हाळ जुना राज्यमार्ग क्र ३५ असा होता. तेथील नांगुर्ले पळसदरी – न्हावंडे – तळवली डोलवली – अंजरुण – हाळ येथील शेतकऱ्यांच्या जागा सन २०१२ – २०१३ पासुन शासनाने संपादित केल्या असून त्याचा योग्य मोबदला त्यांना आजतागायत मिळालेला नाही.

याबाबतीत त्यांनी खालापूर तहसीलदार , प्रांत , जिल्हाधिकारी , MMRDA, MSRDC, NHAI या सर्व ठिकाणी अर्ज विनंती करून सुध्दा त्यांना कुणीच दाद दिली नाही.म्हणूनच त्यांना त्यांच्या हक्काचा मोबादला अद्यापी मिळाला नाही.या विषयावर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा .प्रविण दरेकर यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी मागणी भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांनी केली असता उपरोक्त मागणीवर तातडीने कार्यवाही करून त्यांनी MMRDA आणि जिल्हाधिकारी रायगड यांना सूचना दिल्या आहेत ,त्यामुळे खालापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल ,असे चित्र येथे दिसत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page