if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यात अपघातग्रस्त टीमला यश..
खालापूर( न्यूज-दत्तात्रय शेडगे)
कर्जत तालुक्यातील डिकसल येथे असणाऱ्या पाली भूतीवली धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्जत तालुक्यातील धबधबे आणि धरणावर बंदी असताना कुर्ला नौपाडा मुबई येथून काही पर्यटन हे फिरायला आले होते.
मात्र त्यातील तिघे जण पाली भूतीवली धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रीतम हिरालाल त्रिभुके वय 15 ,प्रीतम गौतम साहू वय 12 , मोहन साहू 16 , रा नौपाडा कुर्ला यांचा बुडून मृत्यु झाला.या याबाबतची माहिती अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांना मिळताच नेरळ पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल मृतदेह शोधण्यास मदत केली, मात्र रात्री उशिरा अपघात ग्रस्त टीम ला मृतदेह शोधण्यात यश आले आहे.