Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेना - शेकाप युतीच्या सौ.जयवंती हिंदोळा ...

कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती पदी शिवसेना – शेकाप युतीच्या सौ.जयवंती हिंदोळा विराजमान..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती पदी शेतकरी कामगार पक्षाच्या पाथरज विभागातून निवडून आलेल्या सौ.जयवंती हिंदोळा या शिवसेना – शेकाप अशी युती होऊन विराजमान झाल्या.त्यामुळे कर्जत तालुक्यात या निवडीमुळे एकच जल्लोष झाला असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कर्जत पंचायत समितीत शिवसेनेचे सात उमेदवार निवडून आले आहेत.वेणगाव – सुषमा ठाकरे , उमरोली – प्रदिप ठाकरे , दहिवली तर्फे वरेडी – अमर मिसाळ , नेरळ – सुजाता मनवे , पोशिर – राहुल विशे , सावेळे – भिमाबाई पवार ,पिंपळोली – काशिनाथ मिरकुटे ,तर शेतकरी कामगार पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.पाथरज – जयवंती हिंदोळा ,कळंब – कविता ऐनकर , तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड – रविंद्र देशमुख ,कशेळे – सुरेखा हरपुडे , तर शेलू – नरेश मसणे असे पक्षीय बलाबळ असताना आज दिनांक १२ जुलै २०२१ रोजी कर्जत पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली.

सदर निवडणुकीत एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली.या निवडणुकीत शिवसेना – शेकाप आघाडीच्या सौ.जयवंती हिंदोळा विराजमान झाल्या.यावेळी त्यांचे अभिनंदन कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे ,उपजिल्हा प्रमुख भाई गायकर ,जिल्हा सल्लागार भरतभाई भगत ,कर्जत ता.प्रमुख उत्तम दादा कोळंबे ,संघटक शिवराम बदे ,शेकापचे जिल्हा चिटणीस विलास थोरवे ,शेकाप राजिप सदस्य तथा माजी सभापती नारायण डामसे ,सभापती सुषमा भानुदास ठाकरे ,माजी सभापती अमर मिसाळ.

माजी सभापती सुजाता मनवे ,माजी उपसभापती मनोहर थोरवे ,विभागप्रमुख ताम्हाणे ,त्याचप्रमाणे पंचायत समितीचे शिवसेना – शेकाप युतीचे सदस्य ,शिवसेना – शेकाप पदाधिकारी शिवसैनिक ,व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेचे सात उमेदवार असतानाही शेकाप ला दिलेले हे उपसभापती पद निवडीमुळे येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना – शेकाप युती होणार ,अशीच हि नांदी दिसते .त्यामुळे या राजकीय घडामोडीत आमदार महेंद्रशेट थोरवे ” हुकमी एक्का ” साबीत झाले आहेत

- Advertisment -

You cannot copy content of this page