अनेक घरात शिरले पाणी, पाताळगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी..
(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
रायगड जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून मुसळधार कोसळनाऱ्या पावसामुळे तालुक्यातील पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदी काठच्या गावांना सतर्कनेचा इशारा दिला आहे.
तर खोपोलीतील शिलफाटा येथील डीसी नगर मधील काही घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तर कर्जत खोपोली रेल्वे रुळावर पाणी आले असून रेल्वे रुळाच्या खालची मातीचा काही भाग पाण्यात वाहुन गेल्याने कर्जत खोपोली रेल्वे सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.
खोपोली बाजारपेठ येथे राहणारे वल्लभ मजेठीया यांच्या घराची भिंत कोसळली असून यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
तर खालापूर जवळील सावरोली पुलावरून पाणी जात असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.गेल्या अनेक दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.या सगळ्या घटनामध्ये खोपोली पोलीस, आणि अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी पोचवून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.