मावळ भाजे- दी .13 जुलै 2020(अष्ट दीशा न्यूज प्रतिनिधी गणेश कुंभार) भाजे येथील 49 वर्षीय महीलेचा कोरोना चाचणी अहवाल दी.12 जुलै रोजी पाॅझीटीव आला आहे.रूग्णामध्ये कोरोना सदृश्य लक्षने आढळून आल्याने दि. 10 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.
संबंधीत कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 3 जणांना हाय रिस्क तर 11 जणांना लो रिस्क मध्ये ठेवण्यात आले आहे. मावळ तालुक्यात झपाट्याने कोरोना रूग्ण वाढताना दिसुन येते आहे .त्याच अनुषंगाने स्वराज नगरी भाजे कंटेनमेन्ट झोन तर भाजे गावठान बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर रूग्णावर तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे . दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे .नागिरीकांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विना कारण फिरणे बंद केले पाहिजे व मास्कचा वापर सातत्याने केला पाहीजे सोशल डिस्टंसिंगचे सतत पालन करा असे आव्हान “अष्ट दीशा “न्युज च्या वतीने करण्यात येत आहे.