Thursday, December 26, 2024
Homeक्राईमवडगाव मावळ येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास एल सी बी ने घेतले...

वडगाव मावळ येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास एल सी बी ने घेतले ताब्यात..

वडगाव मावळ दि.3: रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या एकास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील फरार आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, वडगाव रेल्वे स्टेशन जवळ तलावालगत असलेल्या मोकळ्या मैदानात संशयास्पद हालचाली वरून कुणाल बाबाजी हरपुढे( वय १८ रा.ढोरेवाडा मोरे चौक ता.वडगाव मावळ जि.पुणे) यास ताब्यात घेवून त्याच्या कडून विनापरवाना व बेकायदेशीर हेतुने कमरेला बाळगलेले ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस एकुण किं.रु.५०,१००/- ( पन्नास हजार शंभर रुपये) चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

सदर इसमा कडून चौकशी केली असता हे पिस्टल मध्य प्रदेश येथून विकत आणल्याचे सांगत आहे. सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे , पोलीस हवालदार मुकुंद आयचीत,पोलीस कॉन्स्टेबल.प्राण येवले,पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके,पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page