खोपोली (दत्तात्रय शेडगे)
पोलीस यंत्रणा ही नेहमी विविध कारणाने व्यस्त असते. हे सर्व करीत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याचसोबत विविध कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल असावा ही सुद्धा गरज लक्षात घेऊन जागृत अधिकारी यासाठी प्रयत्न करीत असतात.याच भावनेतुन समाजातील मदत करणाऱ्या घटकांना सोबत घेऊन शहीद अशोक कामटे बॅडमिंटन हॉल व बहुउद्देशीय हॉलचे नुतनीकरण उद्घाटन दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी रायगड पोलिस अधिक्षक अशोक दुधे, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलिस निरिक्षक धनाजी क्षीरसागर व खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते या हस्ते करण्यात आले.
तर यावेळी बॅडमिंटन हॉल व बहुउद्देशीय हॉलच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले असून निसर्गा प्रती असलेली बांधिलकी जपत वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी शिस्तबद्ध कार्यक्रमात बॅडमिंटन हॉलसाठी सहकार्य केलेल्या आस्थापनांचा संन्मान करण्यात आला.
असून यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी आपले विचार व्यक्त करताना खालापूरात सी.सी.टीव्हीचे जाळे उभारणार असे सांगत महाड येथे झालेल्या पुरात नुकसान झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला मदत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच हॉल बनविण्यासाठी केलेल्या उभारणीबद्दल धनाजी क्षीरसागर व सहकारी यांचे आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले. तहे आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर यांनी मांडून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.