Thursday, December 26, 2024
Homeपुणेलोणावळामिसेस महाराष्ट्र एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र 2021 स्पर्धेत लोणावळ्यातील कन्या श्रद्धा मराठे दुसऱ्या...

मिसेस महाराष्ट्र एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र 2021 स्पर्धेत लोणावळ्यातील कन्या श्रद्धा मराठे दुसऱ्या क्रमांकावर…

पुणे : पुणे येथील आयोजित “मिसेस महाराष्ट्र एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०२१ ” मध्ये लोणावळ्यातील श्रद्धा मराठे या ठरल्या विजेत्या. मिसेस महाराष्ट्र एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र 2021 या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकासह पटकावला विशेष पुरस्कार.
लोणावळ्याची कन्या श्रद्धा मराठे हिने या अगोदर मिसेस इंडिया या प्रख्यात स्पर्धेत मिसेस ग्लोरीयस इंडिया हा किताब पटकावला होता.आता तिने पाच हजार स्पर्धकांमधून महाराष्ट्रातील ब्यूटी वीथ ब्रेन या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या ” मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2021 ” या स्पर्धेत पुण्यात झालेल्या अंतिम फेरीत शेवटच्या तीन स्पर्धकात मानाचा मिसेस महाराष्ट्र एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०२१ म्हणून द्वितीय व विनर ऑफ किन्फिडेन्स मिसेस हा विशेष पुरस्कार पटकावला आहे.


या विजेत्यांची निवड करण्यासाठी अभिनेते शक्ती कपूर यांच्या विशेष उपस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शहा, विनय अर्हाना असे नामांकित परीक्षक लाभले आहे. यावेळी
श्रद्धा मराठे हिला द्वितीय क्रमांकाचा मानाचा मुकुट अभिनेत्री कश्मिरा शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर सर्व महिलांमध्ये मिसेस कॉन्फिडनट हा विशेष पुरस्कार श्रद्धा मराठे यांना अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते देवून त्यांना गौरविण्यात आले.


श्रद्धा मराठे यांचे लोणावळा हे माहेर व मुंबई हे सासर असून त्या एक उच्च शिक्षित आणि सक्षम ग्रुहीनी आहेत. अनेक क्षेत्रात अग्रेसर असुन त्या सामाजिक उपक्रमात सहभागी व कार्यरत असतात.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून लोणावळा शहराबद्दल त्यांना विशेष प्रेम असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

- Advertisment -

You cannot copy content of this page