आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी घेतले आशीर्वाद…
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगरी पर्यटन नगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जात असताना कर्जतच्या सौंदर्यात भर येण्यासाठी व मखमली तुरा म्हणून शोभण्यासाठी कर्जतचे प्रवेशद्वार आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नावाने करण्याचा संकल्प कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी केला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या माध्यमातुन व नगरसेवक संकेत भासे यांच्या विशेष प्रयत्नाने कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकासकामांकरिता जवळपास ७ कोटी रुपयाचा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मंजूर झाला आहे.
या कामांमध्ये कर्जतच्या सौंदर्याच्या दृष्टीकोनातून काही विकासकामे होणार आहेत. त्यात प्रामुख्याने कर्जत नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेश द्वाराकरिता रु . ७९ लक्ष इतका निधी मंजूर झाला असून , सदर प्रवेशद्वार पूर्ण झाल्यानंतर त्यास आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. सदरचा ठराव सुद्धा नगरपरिषदेने मंजूर केला आहे.
यात आदरणीय तीर्थरूप निरुपणकार नानासाहेब यांनी केलेले कार्य व अप्पासाहेब, दादासाहेब करत असलेले कार्य खूपच उल्लेखनीय आहे , आणि कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य समजून मुख्य प्रवेशद्वारास आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्या संदर्भातील निवेदन व प्रवेशद्वाराची प्रतिकृती आज आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी आदरणीय सचिन दादा धर्माधिकारी यांची भेट त्यांच्या घरी जाऊन घेऊन त्यांना सादर केले व त्या प्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेतले.
या प्रसंगी आमदार महेंद्रशेट थोरावर यांच्या समवेत कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे आदी उपस्थित होते.