Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडआधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना जयंती दिनी आदरांजली !

आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना जयंती दिनी आदरांजली !

राष्ट्रीय काँग्रेस कर्जत ता.अध्यक्ष मुकेश सुर्वे यांचा पुढाकार…

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्या आमराई येथील निवासस्थानी आज आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. “माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी सर्वोच्च त्याग केला.

एकविसाव्या शतकाची आधुनिक आणि तंत्रज्ञान युक्त आव्हाने पेलण्यासाठी देशाला सज्ज केले. संगणक क्रांती, डिजिटल क्रांती विचारपूर्वक घडवून जवान पिढीला सशक्त बनविले , ग्रामीण भागात दूरध्वनी सेवा पोहोचवली. पंचायत राज व्यवस्था भक्कम केली. नवोदय विद्यालयांची पायाभरणी केली. युवकांना अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क देऊन देशाच्या राजकीय घडामोडीत त्यांना समाविष्ट करून घेतले.

देशाला आधुनिक विचार, जागतिक व्यासपीठांवर सन्मान मिळवून देण्याचं महत्वपूर्ण काम त्यांनी केलं. त्यांच्या रुपाने देशाला युवा, कर्तबगार, दूरदृष्टीचं, सुसंस्कृत नेतृत्वं लाभलं होतं. डिजिटल क्रांतीची सुरुवात स्वर्गीय राजीव गांधींनी केली होती. त्यांची जयंती ” सद्‌भावना दिवस ” म्हणून देशात साजरा होत आहे.

कर्जत तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्या हस्ते स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी रायगड जिल्हा कॉंग्रेस चिटणीस प्रमोद राईलकर, कर्जत तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मुकेश तुकाराम सुर्वे, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, कर्जत तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष संदिप पाटील, कर्जत तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष हेमंत देशमुख,रायगड जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यांक सचिव ईस्माईल दिवाण, कर्जत शहर कॉंग्रेस माजी अध्यक्ष विजय हरिश्चंद्रे, कर्जत शहर कॉंग्रेस सरचिटणीस सुभाष मदन, युवक कॉंग्रेस कार्यकर्ते निहार मोहंती , कर्जत तालुका कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश नलावडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page