प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापूर सद्य पेट्रोल डिझेल आणि गॅस यांच्या किमती गगनाला भिडल्या असून सारी जनता यामुळे मेटाकुटीला आली आहे, याविरोधात काल भारतीय शेतकरी कामगार पक्ष खालापूर आणि खोपोली यांच्या वतीने आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तर कालच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा खालापुरात आल्याने तुम्ही यात्रा काढण्यापेक्षा केंद्रात बसून महागाई कमी करा म्हणजे जनता आशीर्वाद देईल अशी टीका शेकापचे नेते किशोर पाटील यांनी नारायण राणे आणि भाजप वर केली.
या सगळ्या मागण्यांचे निवेदन खालापूरचे नायब तहसीलदार कल्याणी कदम यांना देण्यात आले यावेळी शेकाप खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, शेकापचे जेष्ठ नेते किशोर पाटील, संतोष जंगम, युवा नेते भूषण कडव,खालापूर शहर चिटणीस आकेश जोशी, खालापूर तालुका पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद तावडे, शाम कांबळे, कैलास गायकवाड, उत्तम भोईर, जगन्नाथ ओव्हाळ, नरेंद्र शहा, रवी रोकडे, दिनेश गुरव, प्रवीण लाले, दिलीप ठोंबरे, मनोहर शिंदे, अजय भारती, अबू जळगांवकर, जयंत पाठक, गुरुनाथ साठीलकर, आदीसह अनेक शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते