लोणावळा : वलवण नांगरगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य.नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास.
नांगरगाव ते वलवण रस्त्यावर नांगराई देवी परिसरात खूप मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून प्रवास करताना अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. तसेच याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा रस्ता नांगरगाव ते वलवण ला जोडला जात असला तरी या रस्त्यावरून अनेक नागरिकांची वर्दळ दिवस रात्र सुरु असते.
याठिकाणी प्रवास करताना रिक्षा, कार, मोटारसायकल व पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याठिकाणी खड्डे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे इथे बारा महिने तुंबणारे पाणी, कावेरी फार्म च्या दिशेकडून रस्त्याच्या कडेने वाहणारे पाणी वाहून जाण्यासाठी इथे गटर नसल्याने हे पाणी याच ठिकाणी तुंबून राहते आणि परिणामी या ठिकाणी खड्डे निर्माण होतात हे खड्डे बुजवून येथे गटर काढल्यास हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.
नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासाकडे मात्र प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लोणावळा प्रशासनाने हे खड्डे ताबडतोब बुजवून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.