Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रइयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात "जल सुरक्षा" विषय अनिवार्य..

इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात “जल सुरक्षा” विषय अनिवार्य..

या वर्षी पासून इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात “जल सुरक्षा ” विषय अनिवार्य धरण्यात आला आहे.इयत्ता दहावीसाठी स्वविकास व कलारसस्वाद या श्रेणी विषयांऐवजी जलसुरक्षा विषय अनिवार्य म्हणून समाविष्ट करण्यात आला. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे.

यासाठीचे पुस्तक मागील महिन्यात बालभारतीकडून बाजारात उपलब्ध करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असला तरी पुस्तक बाजारात मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.राज्य शिक्षण मंडळाकडून चारवर्षांपूर्वीच इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर जलसुरक्षा विषयचा श्रेणी विषय म्हणून समावेश करण्यात आला होता.

त्यानुसार काही शाळांमध्ये हा विषय विद्यार्थ्यांना पर्यायी विषय म्हणून देण्यात आला होता. मात्र त्याचे छापील पुस्तकच बाजारात उपलब्ध नव्हते, त्यामुळे विषय अनिवार्य करता आला नव्हता. मात्र मागील वर्षी हा विषय नववीत लागू केल्यानंतर यंदा शिक्षण मंडळाने परिपत्रक काढून स्पष्टता आणली आहे.

विषय शिकवण्यावर प्रश्नचिन्ह विषय बदल शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित असते. तसेच याबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण होणेही आवश्यक आहे. मात्र हे झाले नसल्याने हा विषय शिक्षकांनी कसा शिकवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

“बालभारतीने ऑगस्टमध्ये जलसुरक्षा विषयाचे पुस्तक बाजारात आणले. बहुतांश ठिकाणी ते मिळत आहे. शिवाय, आम्ही पीडीएफ प्रतही उपलब्ध करून दिली आहे.” असा खुलासा बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी यांनी केला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page