Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखालापूर पोलीसांनी 12 तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या..

खालापूर पोलीसांनी 12 तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापूर दिनांक 02/10/2021 रोजी मौजे आंजरूण गावचे हद्दीत हॉलीडे आप के लिए या रिसॉर्ट कडे जाणा-या रोडवर एका अनोळखी स्त्री जातीचे प्रेत अर्धवट कपडे परिधान केलेल्या स्थितीत पडलेले आहे अशी माहीती पोलीस ठाणे येथे प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते, स्टाफ सह पोहचले.त्या ठिकाणची घटनास्थळाची परस्थिती पाहीली असता एका महिलेचे प्रेत अर्धवट साडी परिधान केलेल्या स्थितीत होते. तीचे शरिराची पाहणी केली असता तीचे डोक्यामध्ये व चेह-यावर कोणत्यातरी हत्याराने मारल्याच्या जखमा होत्या. यावरून त्या महिलेचा खुन झाला असावा असा संशय बळावला.


सदरची घटनेची माहीती मा. श्री. अशोक दुधे, पोलीस अधीक्षक रायगड, मा. श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, व मा. श्री. संजय शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग खालापूर यांना कळविली. त्यांनी तपासाबाबत योग्यत्या सुचना देवुन मार्गदर्शन केले. त्यानुसार त्या महिलेचे नातेवाईक कोण आहेत. तीचे नाव काय आहे याबाबत आजुबाजुला चौकशी केली असता गावातील सर्व लोक तीस ओळखत होते परंतु तीचे नाव फक्त कमळी असल्याचे त्यांना माहीत होते. ती तीचे नव-यासोबत राहण्यास असुन ते दोघे रस्त्याने पडलेल्या बाटल्या गोळा करून त्या विकुन त्यातुन मिळालेल्या पैशावर जगत होते असे सांगितले.

परंतु कमळी हिचे पुर्ण नाव, किंवा तीचे नव-याचे नाव याबाबत कोणास काहीएक माहीती नव्हती.ते दोघेजण हॉलीडे आप के लिए रिसॉर्ट समोरील पडक्या चाळीमध्ये राहण्यास होते असे सांगितले. तसेच तीस कोणी मारले असावे याबाबत कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे तपासाबाबत काहीही माहीती हाती लागत नव्हती. त्यामुळे गुन्ह्याची उकल होणे अत्यंत कठीण होते.त्यानंतर पोलीस पथकाने नव-याचा शोध घेतला असता तो तेथे मिळुन आला नाही. तसेच ते राहत असलेल्या ठिकाणी रक्ताने माखलेली बेडशिट मिळुन आली. त्यावरून संशय बळावला कि, दोघां पती-पत्नी मध्ये भांडण झाले असावे व त्यातुन ही घटना घडली असावी. त्यानंतर आंजरूण गावातील लोकांकडे चौकशी केली असता त्या दोघा पती-पत्नी यांचे रात्री भांडण झाले असल्याची माहीत मिळाली.


त्यानंतर आंजरूण गावचे पोलीस पाटील, यशवंत बाळाराम रसाळ यांनी मयत हीचे मृत्युबाबत तीचा पती याचे विरूद्ध तक्रार दिल्याने ती खालापूर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर 247/2021 भा.द.वि.स.कलम 302 प्रमाणे दाखल केली.
त्यानंतर गुन्ह्याचे घटनास्थळी मा. श्री. संजय शुक्ला सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग खालापूर यांनी भेट दिली व तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मा.श्री. अनिल विभुते यांनी आरोपीचे शोधाकरीता 03 तपास पथके तयार केली. व मयत हिचे नातेवाईक खोपोली लौजी येथे राहत असल्याची माहीती मिळाली.

त्यानंतर त्यांचा शोध घेवुन त्यांचे मार्फतीने आरोपीचे नाव निष्पन्न करून आरोपीत यास वाकस ता. कर्जत येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश कराड, श्री. शेखर लव्हे, पोलीस उप-निरीक्षक श्री. बजरंग राजपुत तसेच पोलीस हवालदार सुभाष म्हात्रे, निलेश कांबळे, नितीन शेडगे, पोलीस नाईक हेमंत कोकाटे, विशाल सावंत, दत्तात्रेय किसवे, रणजित खराडे, चालक पोलीस शिपाई तुषार आठरे, तसेच महिला पोलीस कर्मचारी हेमा कराळे, लतिका गुरव, सोनम शेळके यांनी कामगिरी पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. अनिल विभते, पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शेखर लव्हे, सहा. पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page