लोणावळा दि.10.: टपरी पथारी हातगाडी पंचायतच्या लोणावळा शहर कार्याध्यक्षपदी रमेश म्हाळस्कर यांची निवड करण्यात आली आहे. लोणावळा टपरी पथारी हातगाडी पंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक हाॅटेल वुडलॅंड लोणावळा येथे आज पार पडली.
टपरी पथारी हातगाडी पंचायत च्या पदाधिकारी यांची सभा संघटनेचे लोणावळा शहर अध्यक्ष वसंतराव काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्या सभेत कष्टकऱ्यांचे नेते प्रदेश अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या मतानुसार रमेश म्हाळस्कर यांची लोणावळा शहर टपरी पथारी हातगाडी पंचायत च्या कार्याध्यक्ष पदि निवड करण्यात आली आहे.
व त्यासंदर्भातील पञक लोणावळा शहर अध्यक्ष वसंतराव काळोखे व कष्टकरी कामगार पंचायत मावळ तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.यावेळी रिक्षा पंचायतचे प्रदेश उपाअध्यक्ष बाबुभाई शेख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हाजी अब्बास खान, उपाध्यक्ष आनंदशेठ पुजारी , अशोकभाऊ कदम व जयदेव खांडभोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.