प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताची मालिका थांबता थाबेना अशी परिस्थिती असून दिवसागणिक अपघाताची मालिका सुरू असून गुरुवारी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणे बाजूकडून कॉईल घेऊन निघालेला ट्रेलर वरील बोरघतात उतरणीवर कॉईल निसटून गेल्याने या ट्रेलरचा पुढचा भाग मोडून पडला तर निसटलली कॉईल त्याच्या मागे असणाऱ्या कंटेनर वर आदळल्याने कंटेनर पलटी होऊन रस्त्यावर आडवा झाला आणि यातील डाळींबाचे दाणे असलेल्या गोणी रस्त्यावर पसरल्या या अपघातात दोन जण ठार तर दोन जन जखमी झाले आहेत या अपघातामुळे काही काल वाहतूक ठप्प झाली होती.
पुणे बाजूकडून मुंबईच्या दिशेने कॉईल घेऊन निघालेला ट्रेलर वरील कॉईल निसटून गेल्याने ट्रेलरचा बॅलन्स गेल्याने पुढील केबीन मोडून पडली तर सदर ची कॉईल दुसऱ्या कंटेनर वर आदळल्याने ती कंटेनर रस्त्यावर आडावा झाला आणि त्यातील डाळिंब बियाच्या गोणी एक्सप्रेस वे वर पसरल्या या अपघात ट्रेलर मधील सुरेशकुमार लक्ष्मणराव गडलिंग अमरावती – ड्रायव्हर राजकुमार सुधाकर राव – दिल्ली हे दोन जण ठार झाले.
तर कंटेनर मधील पप्पू गुप्ता-युपी ,राजकुमर सिंग – युपी दोन जण जखमी झाले असून या अपघाताची बातमी समजताच तात्काळ अपघातग्रस्त टीम ,आय आर बी डेल्टा फोर्स यासह वाहतूक पोलीस व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ट्रेलर मध्ये अडकलेल्या दोन मयत व्यक्तींना बाहेर काढले तर जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठवून मदत कार्य करीत रस्त्यावर आडवा झालेल्या कंटेनर व गोणी बाजूला करून दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर मुंबई कडे जाणारा मार्ग मोकळा केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.