खोपोली(दत्तात्रय शेडगे )
महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांचे प्रमुख मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला ऑल इंडिया धनगर महासंघ दिल्ली रायगड रायगड यांनी जाहीर पाठींबा दिला असून आज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविनजी काकडे आणि युवक कोकण प्रदेश अध्यक्ष नवळराज काळे यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांसोबत आमचा महासंघ ठामपणे उभा राहीले असे आश्वासन ऑल इंडिया धनगर महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे यांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचारयांचे गेल्या अनेक दिवसांपासून लढा एसटी विलिनीकरनाचा हे आंदोलन चालू असून या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत, ह्या मागण्या साठी एसटी कर्मचारी आपल्या कुटूंबासमवेत आझाद मैदान येथे आंदोलन करित आहेत.
या आंदोलनाची दखल अजून सरकारने घेतली नसून हे आंदोलन चालू आहे.याला आज ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे यांनी भेट देऊन त्यांना पाठींबा देऊन लेखी निवेदन दिले.