मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्री एका ट्रक ने खाजगी बस ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात काम करत असलेले तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर बस मधील चालक गंभीर असून 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मुबंई पुणे एक्सप्रेसवरून बस लोणावळा येथून मुंबईकडे नीघाली असता ती फुडमॉल जवळ आली तेंव्हा त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रकने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे बस ने काम बाजूला काम करीत असलेल्या तीन कामगार आणि त्यांच्या वाहनावर धडकली. यात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारासाठी नेते वेळी वाटेत मृत्यू झाला.
बसचा चालकही गंभीर जखमी झाला असून बस मधील 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत, ही बस लोणावळा येथून लग्न समारंभ आटपून मुंबईच्या दिशेने निघाली होती, या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, मृत्युंजय टीम, लोकमान्य आरोग्ययंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत बस मधील प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.