लोणावळा : श्री एकविरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त 2022 या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्सहात संपन्न.
कार्ला येथील 21 वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत रुजू असणारी श्री एकविरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त 2022 या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत औंढे येथील नागनाथ प्राथमिक विद्यालयात संपन्न झाला.यावेळी लोणावळा व ग्रामीण परिसरातील सर्व नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था यांचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वडगाव मावळचे सहाय्यक निबंधक अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी, लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव,जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,माजी शिक्षण सभापती विनय विद्वांस,माजी शिक्षण सभापती जितूभाई टेलर,पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत देशमुख, मावळ वार्ताचे संस्थापक अध्यक्ष संजय अडसूळे,वेहेरगाव येथील प्रसिद्ध गाडामाल सुरेश गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचीव निखिल कवीश्वर, अंकुश देशमुख, लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष संजय पाटील इत्यादी प्रमुख पाहुण्यांसमवेत इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
कुठलीही संस्था ही कामाने मोठी होते.नगराध्यक्षा सुरेखा ताई हे कणखर व्यक्ती मत्व असून लोणावळा नगरपरिषदेने त्यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भारतातून लोणावळा शहराने दुसरा क्रमांक मिळविल्या बद्दल ताईंचे मनापासून अभिनंदन अशी प्रतिक्रिया सहाय्यक निबंधक अधिकारी सूर्यवंशी यांनी यावेळी दिली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंत देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती केदारी यांनी केले.