पुणे जिल्हा : खाद्य पदार्थ पॅकिंग साठी न्यूज पेपरचा वापर करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई.
अन्न औषध प्रशासनाने याबाबत 5/8/2011 रोजी संपूर्ण देशात हा कायदा लागू केला आहे.जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे असा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.
अनेक वेळा लोक बाहेरून नाष्टा मागवितात अन व्यावसायिक वडा पाव,पोहे यासारखे अन्न पदार्थ न्यूज पेपर मध्ये बांधून देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासून बनविलेली असते ( डाय आयसोब्युटाईल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल) या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी होतो हे केमिकल मानवी जीवनास हानिकारक असून अशा वृत्तपत्रात खाद्य पदार्थ पॅकिंग करून देणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण ( FSSAI )भारत सरकार यांनी दि.6/12/2016 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
तरी सर्व अन्न व्यावसायिक, छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडा पाव, भजी व भेळ विक्रेते यांना सूचित करण्यात येते की न्यूज पेपर मध्ये अन्न पदार्थ्यांचे पॅकिंग त्वरित बंद करा अन्यथा अशा व्यवसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल.