लोणावळा : ऑल इंडीया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन लोणावळा शाखा यांच्या तर्फे हाजी इस्हाक पटेल यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे ट्रस्टी हाजी पटेल यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या व्यक्तींची त्या त्या धार्मिक पद्धतीने मोफत अंत्य संस्कार करण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
त्यांच्या अप्रतिम कार्याची दखल घेत ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन लोणावळा शाखेच्या वतीने सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे ट्रस्टी हाजी पटेल यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.