if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
(पत्रकार श्रावणी कामत)
खासदार शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिरा वरील खोचक टिप्पणी संदर्भात काल मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वडगाव येथील पक्ष कार्यालयामध्ये निषेध करण्यात आला, खासदार शरद पवार यांना मावळ तालुका युवा मोर्चाच्या वतीने एक हजारपेक्षा जास्त जय श्रीराम असे लिहलेले पत्र पाठवण्यात आली आहे.
तसेच ५ॲागस्ट रोजी अयोध्या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीतीत प्रभु श्रीराम मंदीरा चे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे मा. राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी सांगितले या प्रसंगी पुणे जिह्वा भाजपा चे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, प्रभारी ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, मा. अध्यक्ष प्रशांत ढोरे ,महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे , पंचायत समिती मा .उपसभापती शांताराम कदम ,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे ,जि.प सदस्य नितीन मराठे ,तालुका संघटन मंत्री किरण राक्षे ,प्रदिप धामणकर ,अविनाश गराडे ,सरचिटणीस सुनिल चव्हाण ,सरचिटणीस मच्छिंद्र केदारी ,वडगाव चे मा. सरपंच नितीन कुडे ,विकास लिंबोरे ,नामदेव वारींगे ,योगेश म्हाळसकर सह युवा मोर्चा कार्यकर्ते,उपस्थित होते.