Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडचुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविण्याच्या कामाला कर्जत भाजपचा विरोध ,आंदोलनाचा इशारा..

चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविण्याच्या कामाला कर्जत भाजपचा विरोध ,आंदोलनाचा इशारा..

५६ करोड रुपयांचा कर्जत-डोणे या महामार्गाची दुरावस्था..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )कर्जत – डोणे हा राष्ट्रीय महामार्गनुकताच सिमेंट काँक्रीटचा हायब्रीड अन्यूटीमध्ये केला होता.पण दर्जेदार माल वापरला नसल्याने थोड्याच दिवसांत तो उखडला गेला.त्यामुळे या महामार्गाची दुरावस्था झाली असून यावर तातडीने दुरुस्ती व्हावी ,या भारतीय जनता पक्षाच्या मागणीवर या सिमेंट काँक्रीटच्या करोडो रुपयांच्या रस्त्यावर खड्डे बुजविताना ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने डांबराचा वापर करून खड्डे बुजविण्याच्या बेकायदेशीर काम केल्याने या कामास विरोध दर्शवुन या बेकायदेशीर कामाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ,असा इशारा किसान मोर्चा कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे यांनी भाजपाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे.

कर्जत – डोणे या महामार्गाचे ५६ करोड रुपयांचे काम गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. हा रस्ता हायब्रीड अन्युटी मध्ये असून ठेकेदाराने दहा वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे. उखडलेला रस्ता त्वरित दुरुस्त करावा ,अशी मागणी भाजपचे नेते सुनील गोगटे यांनी केली होती.
त्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसापासून या रस्त्यावर विविध ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे.जिथे कॉंक्रीट रस्ता आहे तिथे डांबराने खड्डे बुजवले जात आहेत हे पूर्णतः तांत्रिक दृष्ट्या चुकीचे असून ठेकेदारचा फायदा करण्यासाठी अशा पद्धतीचे काम करून घेतले जात आहे का, असा सवाल सुनील गोगटे यांनी उपस्थित केला असून डांबर आणि काँक्रीट हे व्यवस्थित चिकटत नाही,काही दिवसातच पुन्हा त्यावर खड्डे पडतील आणि येथे एक्सीडेंट व्हायला पुनश्च सुरुवात होईल.
म्हणून या बाबतीत त्वरित लक्ष घालून ठेकेदाराकडून योग्य पद्धतीत काम करून घ्यावे ,अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे निवेदन भारतीय जनता पक्षाचे वतीने उपविभागीय अभियंता कर्जत यांना देण्यात आले आहे.
याबाबतीत उपविभागीय अभियंता संजय वानखेडे काय निर्णय घेतात , याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.या प्रसंगी भाजप नेते सुनिल गोगटे , तालुका सरचिटणीस संजय कराळे,शहर अध्यक्ष बलवंत घुमरे ,युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर शितोळे , सांस्कृतिक सेलचे विजय कुलकर्णी आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page