लोणावळा : लोणावळा परिसरातील इंद्रायणी नदी स्वच्छता व खोलीकरणाच्या कामास आज आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.
लोणावळा शहरातून वाहत असलेल्या इंद्रायणी नदी पात्रात जलपर्णीचा विळखा पडला असल्याने गाळ काढून खोलीकरण करण्यात येणार असून पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल व नदीच्या प्रवाहाची गती देखील वाढेल. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी व नाले सफाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
यावेळी लोणावळ्यातील सर्व महा विकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.