Thursday, July 3, 2025
Homeपुणेमावळवाकसई येथील 26 आदिवासी कुटुंबाना रेशनकार्ड उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त...

वाकसई येथील 26 आदिवासी कुटुंबाना रेशनकार्ड उपलब्ध झाल्याने त्यांच्याकडून आनंद व्यक्त…

वाकसई : वाकसई येथील 26 कातकरी कुटुंब रेशनकार्ड पासून अनेक वर्ष वंचित होते. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून रेशन कार्ड उपलब्ध झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

शुक्रवारी दि . 6 मे रोजी राष्ट्रवादीच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने आमदार सुनील शेळके वाकसई येथे आले होते . त्यावेळी काही कातकरी महिलांनी नवीन रेशनकार्ड मिळत नसल्याची तक्रार केली होती . याची दखल घेऊन आमदार शेळके यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते . त्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि .10 मे रोजी वाकसई येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते . त्यामध्ये अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी व आमदार शेळके यांचे सहकारी यांनी कातकरी कुटुंबीयांच्या कागदपत्रांची पूर्तता करून रेशनकार्डाचे अर्ज भरून घेतले होते .

त्यातील पात्र 26 कुटुंबांना शुक्रवार दि .10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रेशन कार्ड वाटप करण्यात आले .

आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या आवश्यक कागदपत्रांमध्ये शिधापत्रिका महत्त्वपूर्ण आहे . त्यामुळे शिधापत्रिका नसणाऱ्या गरजू कातकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता . अनेकदा केवळ रेशनकार्डा अभावी कातकरी बांधव शासकीय योजनेचे लाभ घेण्यापासून वंचित राहत होते . त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नायब तहसीलदार प्रसन्न केदारी , अन्नपुरवठा विभागाचे शिवाजी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page