वडगाव मावळ : राज्यसभा निवडणुकीत भाजपाला तीन जागांवर विजय मिळाला . भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल , अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर बहुमताने निवड झाली . वडगाव शहर भाजपाने हा विजय पेढे वाटून आणि फटाके वाजवून साजरा केला.
याप्रसंगी जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे , तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे , प्रभारी भास्करराव म्हाळसकर , माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , माजी उपसभापती शांताराम कदम , नगरसेवक प्रविण चव्हाण , ॲड . विजय जाधव , नारायण ढोरे , सुधाकर ढोरे , सोमनाथ काळे , पंढरीनाथ भिलारे , प्रसाद पिंगळे , भूषण मुथा , प्रमोद म्हाळसकर , किसनराव वाघवले , विठ्ठलराव घारे , नाथा घुले , श्रीधर चव्हाण , संतोष म्हाळसकर , नितीन गाडे , वसंत भिलारे , प्रज्योत म्हाळसकर , महेंद्र म्हाळसकर , विकी म्हाळसकर व वडगाव शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी ही आगामी निवडणुक विजयाची नांदी आहे . हा विजय आमदार लक्ष्मण जगताप व आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित असल्याचे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी केले , तर युवामोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी आभार मानले.