Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळाभाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविनकुमार जिंदाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा,...

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविनकुमार जिंदाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, लोणावळा शहर काँग्रेसची मागणी !

लोणावळा : अख्ख्या जगाला शांतीचा व बंदुत्वाचा संदेश देणाऱ्या मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर (SAW) यांच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविणकुमार जिंदाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन लोणावळा शहर काँग्रेस (आय) व अल्पसंख्याक सेल तर्फे लोणावळा शहर पोलिस स्टेशनला देण्यात आले.

सध्या सर्वत्र निवडणूकांची चहलपहेल सुरु असून एकमेकांवर चिखलफेक राजकारण्यांमध्ये सुरु असताना भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व नविनकुमार जिंदाल यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य केले असून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतचे निवेदन लोणावळा शहर काँग्रेस (आय ) व अल्प संख्यांक सेलच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांना देण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, मा.नगरसेवक,लोणावळा शहर काँग्रेस निरीक्षक नासीर शेख, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जाकिर शेख,महिला अध्यक्ष पुष्पाताई भोकसे,काँग्रेस उपाध्यक्ष सरफराज शेख,शिक्षण व पालक सेल अध्यक्ष यास्मिन शिकिलकर,कॉर्ड कमिटी सदस्य जंगबहादुर् बक्षी,रवी सलोजा अब्बास खान, ज्येष्ठ सदस्य अनंता काळे,सुरेश पडवळ,सलमान खान, अल्लाहबक्ष शेख, फारूख शेख, अयाज शिकिलकर,मजहर खान,जमीर शेख, शारूख कुरेशी, मनीष गवळी,योगेश गवळी,सूर्यकांत औरंगे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page