वाकसई : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरपरिषदेच्या देखील निवडणुका होणार आहेत . या अनुषंगाने माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सशक्त अभियान अंतर्गत बुथ मावळ मतदार संघातील बुथ अध्यक्षांच्या घरी सदिच्छ भेट देत बुथ अध्यक्षांशी थेट संवाद साधत संघटनात्मक कार्याचाही त्यांनी आढावा घेतला आहे . लोणावळा शहर , ग्रामीण भागातील देवघर , सांगिसे येथील बुथ अध्यक्षांच्या घरी भेटी दिल्या.
याप्रंसगी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे , भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , भाजप मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे , भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे , कामगार अध्यक्ष अमोल भेगडे , वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले , भाजप महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे , सीमा आहेर नाणे मावळ अध्यक्ष तालुका सरचिटणीस मच्छिंद्र केदारी , तालुका युवा मोर्चा कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे , गणेश देशमुख , किसन येवले , सदाशिव देशमुख , महेंद्र शिर्के गणेश आहेर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जावडेकर म्हणाले की , भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार आहे . याचा भाग म्हणून सशक्त बुथ अध्यक्ष यांनी तळागळापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली लोकाभिमुख कामे पोचवावी.
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिकेवर निवडून जावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले . भाजपाच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद गटात सशक्त बुथ प्रमुख यांच्या बैठका घेतल्या जात आहेत . आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती , नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसले तरी जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात , नगरपालिका त्यांच्याकडून गटबांधणी सुरू झाली आहे . निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जाणार असल्याने त्या अनुशंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे.