लोणावळा : लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा लायन अनंता ( अनिल ) गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड संघटनेचा स्थापना आणि प्रतिष्ठापना समारंभ हॉटेल चंद्रलोक येथे पार पडला.सालाबादप्रमाणे जून ते जुलै महिन्यात या संस्थेचा स्थापना आणि प्रतिष्ठापणा समारंभ संपन्न केला जातो यामध्ये नव्याने संस्थेशी जोडल्या जाणाऱ्या सभासदांचे स्वागत व मार्गदर्शन केले जाते. तसेच प्रत्येक शाखेची नव्याने कार्यकारिणी तयार केली जाते. त्यानुसार लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळा शाखेचा स्थापना, प्रतिष्ठापना व पदग्रहण समारंभ मोठया दिमाखात पार पडला. यामध्ये लायन्स क्लब ऑफ डायमंड लोणावळा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा लायन अनंता गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्थापना अधिकारी म्हणून रमेश भाई शहा ( PDG ) तर प्रेरणा अधिकारी म्हणून लायन राजेश अगरवाल यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांची नियुक्ती व लोणावळा डायमंड गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष लायन अनंता ( अनिल ) गायकवाड, स्थापना अधिकारी लायन रमेश शाह (PDG), प्रेरणा अधिकारी लायन राजेश अगरवाल,प्रदेश अध्यक्षा लायन राजेश्री शहा , झोन चेअरपर्सन लायन दाऊद थासरावाला, सेक्रेटरी लायन अनंता पाडाळे, खजिनदार लायन तस्नीम थासरावाला इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्याचा आढावा देत आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून लायन नवीन भसे, लायन अशोक ढाकोल, लायन अभिजित देशमुख, डॉ. संदीप डोंबले, लायन रेखा पाडाळे, लायन अनंता पाडाळे आदी सदस्यांनी नव्याने प्रवेश केला. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी 2021/22 या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना संघटनेतर्फे गौरविण्यात आले त्यात ऍड. एस. बी. नागेश यांना “डायमंड प्राईड अवॉर्ड “, अरविंद कुलकर्णी यांना ” डायमंड एक्सलेंट अवॉर्ड “, तर प्रकाश पाटील यांना “स्पेशल अवॉर्ड”देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास लायन सुनीता गायकवाड, लायन वैभव गदादे, लायन शारदा गायकवाड, लायन भरत चिले, लायन शैलेश गायकवाड, लायन संध्या खंडेलवाल, लायन प्रकाश गुप्ता, लायन वंदना अगरवाल, लायन मनोज जयस्वाल, लायन किशोर ओसतवाल, लायन प्रकाश पवार, लायन योगेश गोपाळे, लायन गौरी गायकवाड आणि इतर सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुलाल तारे यांनी केले तर आभार लायन अनंता गायकवाड यांनी मानले.